
प्राचीन ऐतिहासिक शिव मंदिराचा मनमोहक देखावा; थिटे पाटील कुटुंबीयांच्या कलाकृतीला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर : हातवे बु येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आकर्षक सजावट आणि देखावे साकारले जात असताना, राजेंद्र विठ्ठलराव थिटे पाटील यांनी आपल्या घरी साकारलेला प्राचीन ऐतिहासिक शिव मंदिराचा काल्पनिक देखावा परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. अत्यंत बारकाईने, कल्पकतेने आणि कलात्मक पद्धतीने साकारलेल्या या देखाव्यामुळे शिवभक्त तसेच गणेशभक्तांना एक आगळावेगळा आध्यात्मिक अनुभव मिळत आहे. या देखाव्याच्या निर्मितीसाठी त्यांचे चिरंजीव रोहन थिटे यांनी तब्बल तीन महिने अथक परिश्रम घेतले( कॉलेज करत असल्यामुळे वेळ मिळेल त्यानुसार). मंदिरातील प्रत्येक घटकाची रचना आणि सजावट

























