गुन्हे शाखा युनिट-७ ची कारवाई; ४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त*
पुणे (प्रतिनिधी): अमर शिवाजी पठारे
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-७ कडून वाघोली परिसरात मोठी कारवाई करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व विदेशी सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात काही व्यक्तींकडून गुप्तपणे गुटखा व विदेशी सिगारेटची साठवण व विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-७ ने सापळा रचत छापा टाकला. या वेळी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा बेकायदेशीर विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
➡️ पोलिसांची ठाम भूमिका:
पुणे शहरात बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे









