जनसेवेची दखल; चंद्रकांत होरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार

प्रतिनिधी लातूर

विकासकामांचा धडाका आणि प्रभावी जनसंपर्कामुळे अंबुलगा बु. गटातील कार्याची राज्यस्तरावर दखल

लातूर : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अंबुलगा बु. गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत विठ्ठलराव होरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांच्या जनसेवेची, विकासाभिमुख कार्याची आणि मतदारसंघातील प्रभावी कामगिरीची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

अंबुलगा बु. गटात विविध विकासकामांचा धडाका लावत तसेच नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत चंद्रकांत होरे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, जनहिताची कामे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला आहे.

याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी होरे यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे जनतेसाठी कार्यरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Traffic Tail