आमदार सीमा हिरे यांनी दिला कोठावदे कुटुंबाला आधार

नाशिक प्रतिनिधी |अमर पठारे

सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथील कोठावदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आमदार सीमा हिरे यांनी मदतीचा हात पुढे करत कुटुंबाला आधार दिला आहे. घरातील प्रमुख सदस्य निलेश कोठावदे यांच्या आकस्मिक निधनानंतर काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचेही निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट आले होते. या दुहेरी आघातामुळे खचलेल्या किरण कोठावदे यांनी आमदार सीमा हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

यानंतर आमदार सीमा हिरे यांनी तातडीने दखल घेत कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शासकीय लाभार्थी समितीच्या अध्यक्षा जयश्री वाघ आणि युवाली देशमुख यांनीही कोठावदे कुटुंबाची भेट घेत परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी किरण कोठावदे यांच्या मुलगा संकेत याला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ अंतर्गत शैक्षणिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Leave a Comment

Traffic Tail