अवैद्य गावठी दारुधंद्यावर पोलीसांचा छापा हजारोंचा मुद्देमाल जप्त.
खंडाळा प्रतिनिधी : संदेश चव्हाण
पुण्यातील गावठी दारुचे विक्रीमुळे झालेल्या मनुष्यहानीच्या घटनेच्या अनुषंगाने संपुर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना काढीव हातभट्टीची दारु मिळुन येताच कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिले. त्या आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरिक्षक शिरवळ, स्थानिक पोलीस अंमलदार व पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके स्थागुशा सातारा व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या पेट्रोलिंग टीम तयार करुन दिनांक ६/६/२०२६ रोजीचे पहाटे रवाना केले.
पेट्रोलिंग करित असताना त्यांना शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे सागंवी ता. खंडाळा गावचे हद्दीत एक इसम संशयीतरित्या हालचाल करित असताना दिसला व पोलीस अंमलदारांना पाहून पत्रा शेडचे आडोश्याला लपला. त्यास लागलीच ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने आपले नाव तैय्यब बक्षु तांबोळी रा. दत्तनगर शिरवळ ता. खंडाळा असे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता तो हातभट्टीची दारु विक्री करण्यासाठी तेथे असल्याचे दिसून आल्याने आधिक तपास करता त्याचेकडे एकूण ३६४ लीटर २५० मिलीची काढीव हातभट्टीची गावठी दारु मिळून आली म्हणून शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई स्थागुशा साताराचे पोलीस निरिक्षक विश्वजित घोडके व त्यांचे टिममधील सहा. फौजदार मुलाणी, पोलीस हवालदार २२०८ कांबळे, पोना ९०२ पवार, पोकाँ १५४५ निकम, पोकाँ १७२२ दौंड तसेच शिरवळ पोलीस ठाणेकडील पोहवा ३६६ फाळके, पोकौं ९६६ बगाड, पोकौं १७८७ चव्हाण यांच्या ट्मिने जावून हातभट्टीचा माल ताब्यात घेवून जप्त केला व आरोपी नामे तय्यब बक्षु ताबोळी रा. दत्तनगर शिरवळ ता. खंडाळा याचेसह पोलीस ठाणेस येवून गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस उप निरिक्षक सतिश आंदेलवार हे करित आहेत.
सदरची कारवाई श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके स्थागुशा सातारा व पोलीस निरिक्षक यशवंत नलवडे शिरवळ पोलीस ठाणे तसेच सहा. फौजदार मुलाणी, पोलीस हवालदार २२०८ कांबळे पोना ९०२ पवार, पोकौं १५४५ निकम, पोकों १७२२ दौंड तसेच शिरवळ पोलीस ठाणेकडील पोहवा ३६६ फाळके, पोकौं ९६६ बगाड, पोकौं १७८७ चव्हाण यांनी केलेली आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगीरी बाबत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व शिरवळ पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक, श्री विशाल खांबे, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकानां आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात बेकायदेशीर दारु विक्री करणे, निर्मिती करणे, वाहतुक करणे, साठवणुक करणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ शिरवळ पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. माहीती देणा-या व्यक्तीची ओळख पुर्णपुणे गोपनीय ठेवण्यात येईल.









