एकलव्य अकॅडमीत 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : प्रतिनिधी

Eklavyaa Academy तर्फे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा “Felicitation Ceremony 2025-26” हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

“Aim . Learn . Achieve” हे ब्रीदवाक्य जपत अकॅडमीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे योगदान आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचाही विशेष उल्लेख करण्यात आला.

तसेच अकॅडमीच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने मेहनत घेणारे पार्टनर ऋषिकेश थोरवे, श्रावणी ठाकूर, सानिका मुजुमले यांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले. क्लासच्या वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे अकॅडमीला यशाची नवी दिशा मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली तसेच मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला.

या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातही अधिक मेहनत घेऊन यश संपादन करण्याचा आत्मविश्वास वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail