विठ्ठलराव वरुडे पाटील यांना समाज भूषण’ पुरस्कार प्रदान

पुणे प्रतिनिधी:

रुग्णसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्य करणारे माय माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांना ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका च्या वतीने ‘ हा सोहळा जाक माता गार्डन मंगल कार्यालय शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती समाजरत्न,उद्योगरत्न, समाज भूषण,दानशूर,व्यक्तिमत्व एन के टी चे ट्रस्टचे अध्यक्ष शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला. शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उबाठा यांचा समावेश होता. या मान्यवरांच्या हस्ते वरुडे पाटील यांना गौरवण्यात आले.


संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरगल्ल यांनी व शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी आपल्या मनोगतात विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला व म्हणाले गेल्या १५ वर्षांपासून वरुडे पाटील यांनी रुग्णसेवेच्या क्षेत्रात, विशेषतः वृद्धांच्या आरोग्यासाठी जे अखंड कार्य केले आहे, त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की “अशा सन्मानांमुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक प्रगल्भ होते. भविष्यातही समाजसेवेचे हे व्रत मी अधिक जोमाने पुढे नेईन. मला मिळालेला हा पुरस्कार मी आजवर सेवा केलेल्या सर्व ज्येष्ठ आणि वृद्धांना समर्पित करतो.”

या कार्यक्रमाला प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुकाचे सर्व पत्रकार बांधव पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail