दिशाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वाईत यशाचा जल्लोष JEE, NEET, MHT-CET, शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; विजय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाई, दि. ३० :

JEE Main व Advanced, NEET, MHT-CET, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच फाउंडेशन ऑलिंपियाडमध्ये दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाचा जल्लोष काल वाई शहरात विजय रॅलीद्वारे करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिशाच्या विद्यार्थ्यांनी सलग आठव्या वर्षी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. JEE Main व Advancedमध्ये संस्थेचे ३९ विद्यार्थी पात्र ठरले असून, सहा विद्यार्थ्यांची IITमध्ये निवड झाली आहे. NEETमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने दमदार वाटचाल केली. MHT-CETमध्ये सात विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले, तर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील पहिल्या १५ विद्यार्थ्यांमध्ये दिशा स्टडी सेंटरच्या तब्बल सहा विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले.

फाउंडेशन ऑलिंपियाडमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शालेय पातळीपासूनच स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीचा पाया मजबूत असल्याचे दाखवून दिले. विविध परीक्षांमधील या यशामुळे दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी वाईच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या यशाबद्दल दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशासाठी दिशा अकॅडमीमध्ये सातत्याने नियोजनबद्ध आणि प्रचंड मेहनत घेतली जाते. बदलत्या स्पर्धात्मक परीक्षांचे स्वरूप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक अध्यापन पद्धती आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन राबविले जाते.

केवळ परीक्षांमध्ये यश मिळविणे हा आमचा उद्देश नसून, गुणवत्तेसोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव जपणारी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कामही आम्ही तितक्याच जबाबदारीने करीत आहोत.” दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या सचिव प्रा. रुपाली कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी वाई शहरातून काढण्यात आलेल्या विजय रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

रॅलीदरम्यान नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिशाच्या विद्यार्थ्यांच्या या यशाने देशातील IIT, वैद्यकीय व नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश वाईच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail