रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

पाचगणी

भिलारच्या डोंगररांगांतून निघालेला एक तरुण… हातात दुचाकीचे हँडल, डोळ्यांत मोठी स्वप्ने आणि मनात माणुसकीचा अथांग सागर! आज तोच तरुण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात “यामाहा किंग” म्हणून ओळखला जातो. पण ही ओळख केवळ वेगाची नाही, तर विश्वासाची आहे. हे नाव आहे अमित दादा भिलारे. देशभरातील दुचाकीप्रेमींनी त्यांना त्रिवेंद्रमचे यामाहा सम्राट, चेन्नईचा सर्व रस्त्यांचा राजा, पंजाबचा यामाहा वाघ आणि दिल्लीचा यामाहा तारा अशा बहुमानाच्या उपाधींनी गौरविले आहे. या प्रत्येक सन्मानासोबत त्यांनी आपल्या भिलार गावाचे नाव अभिमानाने देशभर पोहोचवले. पांचगणीतील एबी मोटर्स टीव्हीएस वाहन विक्री केंद्र आणि हॉटेल पारिजात यांच्या माध्यमातून त्यांनी प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि विश्वास यांचा आदर्श निर्माण केला आहे. मात्र त्यांची खरी ओळख केवळ यशस्वी उद्योजक म्हणून नसून, गरज पडताच सर्वप्रथम मदतीला धावून जाणारा माणूस म्हणून आहे.

रक्तदान शिबिर असो, सामाजिक उपक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या गरजू कुटुंबाच्या मदतीची वेळ असो… अमित दादा नेहमीच पुढाकार घेतात. म्हणूनच अनेकांच्या तोंडी एकच वाक्य ऐकायला मिळते— “संकटात देव दिसत नाही… पण अमित दादा नक्की दिसतात!” पांचगणी व्यायाम मंडळ, आय लव्ह पांचगणी परिवार, घाटजाई ढोल पथकाचे अध्यक्ष, महाराणा प्रताप मंडळ तसेच सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर या विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अभिनय क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आप्पी आमची कलेक्टर’, ‘देवमाणूस’ आणि ‘खेडू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत.

आज वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल एकच वाक्य पुरेसे आहे— “वेगामुळे ‘यामाहा किंग’ ही ओळख मिळाली… पण माणुसकीमुळे हजारो हृदयांचा ‘दादा’ झाला!” भिलार, पांचगणी आणि असंख्य मित्रपरिवाराच्या वतीने अमित दादा भिलारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच सदिच्छा.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail