वाई शहराला दिलेल्या शब्द वाई शहराने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार :- ना. जयकुमार गोरे

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर सत्कार, अनिल सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

वाई प्रतिनिधी
दि. 24 वाई :- वाई शहराचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातोय आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या साडेचार वर्षाचा जो कालखंडाचा शिल्लक राहिलेला आहे त्या कालखंडामध्ये वाई शहराला दिलेल्या शब्द वाई शहराने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसाचे औचीत्त साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दिली. ना.जयकुमार गोरे, आमदार धैर्यशील कदम यांच्या हस्ते नगराध्यक्ष अनिल सावंत व जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, अॅड. दीप्तीताई पिसाळ, विठ्ठल बनसोडे, चिन्मय कुलकर्णी, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, प्रताप यादव, सौ. सरिता अनिल सावंत, नगरसेवक प्रसाद बनकर, विजय ढेकाणे, सचिन सावंत, संग्राम सपकाळ, सौ.ज्योती गांधी, नूतन मालुसरे, केतकी पाटणे, डॉ. जागृती पोरे, अपर्णा जमदाडे, पद्मा पाडळे, डॉ. मकरंद पोरे, जितेंद्र पिसाळ, प्रवीण जाधव, निलेश मोरे, संतोष जमदाडे, स्वप्नील भिलारे, श्रीकांत सावंत, विजय पाटणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. जयकुमार गोरे म्हणाले, वाई शहराची सेवा करण्याची ताकद अनिल सावंत यांना द्यावी आणि जे जे काम या शहरासाठी या भागासाठी त्यांनी योजलेला आहे ते पूर्ण व्हावे त्यासाठी लागणार निधी, खंबीर साथ माझी नेहमीच राहील असेही गोरे यांनी सांगितले. ते असेही म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचा वाढदिवस झाला आणि प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य व गरजू लोकांना समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा आवाहन माननीय देवेंद्रजींनी केलं आणि मला आनंद आहे की राज्यातल्या तमाम जनतेनं त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
विक्रमी असं रक्तदान झालं त्यासोबत विक्रमी असे अनेक सामाजिक उपक्रम झाले. आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कशाचीही तमा न बाळगता आपला वाढदिवस माऊली आणि तुकोबारायाच्या चरणी साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि काल त्यांनी आशीर्वाद घेतले आणि माऊलीनी, तुकोबारायांनी आणि विठोबा यांनी त्यांच्या पाठीशी आशीर्वाद उभे केले की जे महाराष्ट्राचे स्वप्न आपण बघताय त्या स्वप्नासोबत तमाम महाराष्ट्रातली जनता उभी आहे. वाई शहराला दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहेच हा प्रश्न पडलेला नागरिकांना पडलेला आहे. पण काळजी करू नका जो जो शब्द वाई शहराला दिलेला आहे. तो तो शब्द पूर्ण केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला मत मागायला येणार नाही. वाई शहरासह या सातारा जिल्ह्यातला निवडणुकीमध्ये जो जो शब्द आम्ही दिलेला आहे त्या त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासंदर्भात लवकरात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही एक बैठक मुख्यमंत्री सोबत घेऊन प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहोत.
राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी मला सांगितलं की धैर्यशील सारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा लागेल आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आज दादा आपल्या सोबत आमदार म्हणून या त्यांचाही सन्मान आज या ठिकाणी करण्यात आला. अनिल सावंत आपल्याला पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा आपल्या हातून खूप चांगलं काम व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा, सांगली विधानपरिषदेचे आमदार धैर्यशील कदम म्हणाले, वाईनगरी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, अनेक प्रश्न या ठिकाणी नगराध्यक्षांनी मांडले. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान नमामि कृष्णा हा प्रोजेक्ट पवित्र नाव म्हणून जय भवानी नमामि गंगेच्या धर्तीवर हा नवा प्रोजेक्ट या ठिकाणी सरकारण्यासाठी प्रयन्त करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या त्या त्या लोकांना न्याय देते, या ठिकाणी सन्मानपूर्वक आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय, आणि आपण सगळे हे कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
खरंतर वाई नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदान दिलं आणि मी आमदार म्हणून निवडून आलो तमाम वाईकरांचे मी मनापासून आभार मानतो असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल सावंत यांच्या वाढदिवसाचे औचीत्त साधून गायन स्पर्धा, ढोल वाजण स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान, दिव्यान्गांचा सन्मान, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी ना. जयकुमार गोरे, आमदार धैर्यशील कदम यांचा वाईकर नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आल. सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले तर निलेश मोरे यांनी आभार मानले. यावेळे वाईकर नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

 

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail