युवा क्रांती फाउंडेशनमध्ये महत्त्वाची नियुक्ती; मोहन ज्योतिराम नारायणकर यांच्यावर धाराशिव जिल्हा युवा अध्यक्षपदाची जबाबदारी

प्रतिनिधी | धाराशिव

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. श्री. मोहन ज्योतिराम नारायणकर यांची धाराशिव जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्रजी सूर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा. शिवाजीराव शेलार, तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. अनिल रेळेकर आणि पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहन ज्योतिराम नारायणकर यांच्यावर विश्वास व्यक्त करत, युवकांचे संघटन, सामाजिक जनजागृती, ग्राहक संरक्षण, पत्रकार हित आणि माहिती अधिकाराबाबत प्रभावी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नियुक्तीनंतर मोहन ज्योतिराम नारायणकर यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणांशी प्रामाणिक राहून समाजहितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

युवा क्रांती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Comment

Traffic Tail