२२ वर्षीय तरुणी बेपत्ता, नागरिकांना मदतीचे आवाहन

प्रतिनिधी : अमर पठारे

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. ओमकार नगर परिसरातील श्रुती सखारचंद पटाईत (वय २२ वर्षे) ही तरुणी दिनांक ५ जून २०२६ पासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ती ओमकार नगर, प्रथम लाँसजवळ, मालेगाव येथे वास्तव्यास आहे.

या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. संबंधित तरुणीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या एका शेअरमुळेही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail