आदर्श शिक्षक परमपूज्य गुजर गुरुजींच्या १०४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

युवा क्रांती फाउंडेशन कुटुंबाकडून दीर्घायुष्याच्या सदिच्छा

प्रतिनिधी : अमर पठारे

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श शिक्षक, ज्येष्ठ समाजभूषण आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे परमपूज्य गुजर गुरुजी यांनी आपल्या आयुष्याचा प्रेरणादायी १०४ वा वाढदिवस साजरा केला. या अविस्मरणीय क्षणानिमित्त युवा क्रांती फाउंडेशन कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या. शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या ज्ञानदान, संस्कार आणि सेवाभावी वृत्तीमुळे गुजर गुरुजींनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. त्यांच्या कार्याचा ठसा आजही समाजमनावर कायम असून, त्यांचे संपूर्ण आयुष्य हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज अहिरे यांनी गुजर गुरुजींना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि शतायुषी जीवनासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याचबरोबर युवा क्रांती फाउंडेशनच्या सर्व महिला व पुरुष वरिष्ठ पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या वतीनेही गुजर गुरुजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तसेच, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गुजर साहेब यांनी आपल्या वडिलांची केलेली निस्वार्थ सेवा आणि त्यांच्याप्रती असलेला आदर हा समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गारही यावेळी काढण्यात आले. “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या संस्कारांचे जतन करणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

परमपूज्य गुजर गुरुजींना त्यांच्या १०४ व्या वाढदिवसानिमित्त युवा क्रांती फाउंडेशन कुटुंबाकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांना निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail