उघड्या खड्ड्यामुळे तरुण मृत्यूशी झुंज देत; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रतिनिधी : अमर पठार

शिरूर, ता. शिरूर (टाकळी हाजी), दि. १८ जून २०२६ :
निमगाव दुधे ते मलठण रस्त्यावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठा व उघडा खड्डा खोदून तो कोणत्याही प्रकारचे सुरक्षा बॅरिकेड, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक न लावता खुला ठेवण्यात आल्याने गंभीर अपघात घडला. या अपघातात टाकळी हाजी येथील अनुराज निकम (वय २७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे दुचाकीस्वार अनुराज निकम यांची गाडी थेट खड्ड्यात कोसळली. अपघातानंतर अनेक दिवस उलटूनही संबंधित कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, उपचारासाठी मोठा खर्च होत असून आर्थिक परिस्थिती बिकट आहे. संबंधित कंत्राटदाराने मदत करण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

“रस्त्यावरील कामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail