गड किल्ले संवर्धन संस्थेचा उपक्रम.

पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे

गड किल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने दिनांक १४\६\२०२६ रविवार दिवशी सिंहगड पाईवाट चौंडाई देवी मुळ मंदिर दिशादर्शक बोर्ड व सिंहगड पार्किंग येथे नियमावली बोर्ड बसविण्यात आले. या बोर्डच्या माध्यमातून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकास किल्ल्यावर स्वच्छता राखावी तसेच प्रशासनाकडून घालून दिलेल्या सुचना समजणार आहे. आतकरवाडीतुन किल्ल्यावर पाईवाटेने जात असताना काही अंतरावर भातखळे आहे. या ठिकाणाहून चौंडाई देवीचे मुळ मंदिराकडे एक पाईवाट जाते त्या वाटेला श्री चौंडाई देवी मुळ मंदिरा कडे जाण्याचा मार्ग हा एक दिशादर्शक बान असलेला बोर्ड बसविण्यात आला आहे. या बोर्डच्या माध्यमातून घेर्यातील गडदैवत कोठे आहे व त्या ठिकाणी जायचे कसे हे शिवभक्तांना व पर्यटकांना समजण्यासाठी मदत होणार आहे.

या मोहिमेचे आयोजन श्री शांताराम लांघे, विजय साळेकर, मोसिन मुल्ला, जीवन बराटे, शिवरत्न स्वामी, नाना जरांडे, यांनी केले. तसेच या मोहिमेला मा.श्री रंगनाथ आप्पा पढेर, श्री निलेश सांगळे, श्री पंडित आण्णा यादव, संतोष पढेर, हेमंत गोळे, श्री शिवाजी लांघे, श्री मंगेश गोफणे, यांचे व स्थानिक ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail