महाराष्ट्र प्रतिनिधी : अमर पठारे
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे “IIT बाबा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक मिश्रा यांच्याबाबत सोशल मीडियावर गंभीर आरोपांचे वृत्त मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टनुसार, आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली काही महिलांना आपल्या विश्वासात घेऊन त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हायरल माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याचा दावा केला जात असून, तपासादरम्यान मोबाईल फोनमधून काही आक्षेपार्ह साहित्य आणि व्हिडिओ आढळल्याचेही सांगितले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधित पुराव्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी कोणत्याही स्वयंघोषित गुरु किंवा धार्मिक व्यक्तींवर अंधविश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता आणि सतर्कता राखणे ही काळाची गरज असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.









