रिपाई (आठवले) च्या नमस्कार आंदोलनाने महाबळेश्वर नगरपालिकेला लाखोंचा फटका ३ तास टोलनाका बंद आंदोलन

(वाई प्रतिनिधी )

महाबळेश्वर, दि. 07 :
महाराष्ट्रभर गाजत असणाऱ्या महाबळेश्वर टोल प्रकरणा विरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातील टोल नाक्यावर पर्यटकांची होत असलेली आर्थिक लूट, मनमानी शुल्क आकारणी आणि जनतेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले.
रिपाईच्या आक्रमक भूमिकेमुळे दिवसभर टोल नाक्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. या आंदोलनाला पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून चुकीच्या पद्धतीने कर वसूल करण्यात येत असतो यामध्ये वाहनाचा पोल्युशन कर वेगळा व गाडीमध्ये बसणाऱ्या प्रत्येक माणसामागे वेगळे पैसे घेतले जातात याव्यतिरिक्त फॉरेस्ट चा सुद्धा एक वेगळा कर आकारला जातो. आज देशांमध्ये फास्टटटॅग येऊन जवळपास दहा ते बारा वर्षे झालेले आहेत. मात्र रोज लाखो पर्यटक येणाऱ्या महाबळेश्वर मध्ये आजही फास्टटॅग किंवा ऑनलाईन पेमेंट सुविधा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.
त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला. अनेक वेळा प्रशासकीय कार्य काळामध्ये यासंबंधी लेखी माहिती मागवली असता याला योग्य प्रतिसाद महाबळेश्वर नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला नव्हता. त्यामुळेच आज महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून अवाजवी शुल्क आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. “पर्यटन वाढवायचे की पर्यटकांना लुटायचे?” असा सवाल उपस्थित करत टोल व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अनेक पर्यटकांनी रिपाईच्या भूमिकेचे स्वागत करत अभिनंदन केले. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी देखील या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने स्पष्ट इशारा दिला आहे की, पर्यटक आणि स्थानिक जनतेवरील अन्याय तात्काळ थांबविण्यात आला नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे जागतिक पर्यटनस्थळ असून पर्यटकांची लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही..
“जनतेच्या हक्कासाठी संघर्ष हा आमचा धर्म आहे आणि अन्यायाविरोधातील लढा अखंड सुरू राहील,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे रिपाईच्या कार्यकर्त्यांनी हात जोडून स्वागत केले..
श्री अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशाने सुरु असणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्री स्वप्नील भाई गायकवाड यांनी केले.
या आंदोलनासाठी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष जॉन भाई जोसेफ कार्याध्यक्ष आतिश भोसले श्री मिथुन तळवळकर श्री विनय गायकवाड फौजीया मुलानी संतोष तात्या गायकवाड श्रीकांत बापू निकाळजे एकनाथजी रोकडे अमर वाघमारे बाजीगर इनामदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail