पुणेकरांचा ११० कोटींचा फटका; प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह 

पुणे प्रतिनिधी – अमर शिवाजी पठारे

पुण्यातील विविध विकासकामांमुळे तब्बल ₹११० कोटींचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुकीच्या नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या निर्णयांमुळे नागरिकांचा पैसा अक्षरशः वाया गेल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ₹८० कोटी खर्च करून पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर परिसरातील जुने पूल बांधण्यात आले होते. मात्र हे पूल आता अस्तित्वातच नाहीत.
₹१५ कोटी खर्च पूल पाडण्यासाठी आणि तेथील राडारोडा हटवण्यासाठी करण्यात आला. ₹१० कोटी हडपसर गाडीतळ आणि इतर पुलांच्या नियोजित दुरुस्तीवर अनावश्यकपणे खर्च झाल्याचे समोर आले.
याशिवाय ₹५ कोटी मेट्रो प्रकल्पासाठी नव्याने बांधलेल्या पुलांमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी खर्च करण्यात आले.
यामुळे एकूण नुकसान ₹११० कोटींपेक्षा अधिक झाल्याचे समोर येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, “या निधीतून पुण्यात किमान १० नवीन सुसज्ज सरकारी शाळा किंवा ५ मोठी रुग्णालये उभी राहू शकली असती. मात्र चुकीच्या निर्णयांमुळे हा पैसा वाया गेला.” दरम्यान, या प्रकरणी पुणे महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी औपचारिक अर्ज सादर करण्यात आला आहे. हा अर्ज अमर शिवाजी पठारे, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Traffic Tail