१ kv सोलर रूफटॉप योजनेच्या अंमलबजावणीस पसरणीतून सुरुवात लाईट बिल मुक्त गाव या मोहिमेस प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान – श्री स्वप्निल भाई गायकवाड पं.स. सदस्य

वाई प्रतिनिधी दि. 2 पसरणी येथील श्री केशव गंगाराम महांगडे व श्री विश्वास गंगाराम महांगडे यांच्या घरावर एक किलोवॅट सोलर रूफटॉप योजनेतून मिळालेले सोलर बसवण्याचे काम पूर्ण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक २/९/२०२६ रोजी सकाळी ९ वा. पंचायत समिती सदस्य श्री स्वप्निलभाई गायकवाड, महावितरण अधिकारी व पसरणी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आले.

या योजनेसंबंधी अधिक माहिती त्या ठिकाणी देण्यात आली व या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा व आपले गाव लाईट बिल मुक्त करण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे ही विनंती करण्यात आली.


या अनुषंगाने अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित केले व याचे योग्य निरसन त्या ठिकाणी महावितरण अधिकारी व स्वप्निल भैया यांच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पसरणी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये श्री पांडुरंग अण्णा महांगडे, श्री केशव महांगडे अण्णा, विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री विलास आबा महांगडे, श्री दिनकर महांगडे चेअरमन,श्री आनंदराव पाटील, श्री शशिकांत आप्पा महागडे, श्री मधुकर साबळे,श्री शिवाजी अण्णा येवले, श्री उमेश येवले, श्री राजेंद्र येवले, श्री दीपक महांगडे, श्री राजेंद्र गायकवाड अण्णा, श्री दत्तात्रेय बापू महांगडे, श्री शांताराम महांगडे, श्री दिलीप अमराळे, श्री भानुदास नेवसे, श्री मधुकर कोचळे, श्री माऊली येवले, श्री नामदेव पवार, श्री सुनील महांगडे, श्री सचिन येवले, श्री राजेंद्र महांगडे नाना, श्री गोविंद येवले, श्री अमोल आबा महांगडे, श्री राजेंद्र महांगडे, श्री बंडू भिसे बाबा, श्री अंकुश भिसे, श्री नरेश भिसे, श्री बाबू दौंड, श्री रामदास नेवसे, श्री मनोहर नेवसे, श्री बाळासाहेब मुळीक, श्री दत्तात्रेय मांढरे, श्री रामदास शिर्के.

या कार्यक्रमाचे योग्य नियोजन –श्री अमोल आबा महांगडे मा. अध्यक्ष जि. प. प्रा. शाळा पसरणी, श्री आनंदराव येवले सदस्य ग्रामपंचायत पसरणी, श्री राजेंद्र येवले जीवन आधार नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन, श्री उमेश येवले माजी सरपंच, श्री मधुकर कोचळे मा. ग्रा. सदस्य, श्री मधुकर साबळे ज्येष्ठ कार्यकर्ते, सौ अनुराधा भिसे यांनी केले.

Leave a Comment

Traffic Tail