दत्तात्रय महांगडे यांचा ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान

वाई : 30 समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. दत्तात्रय यशवंत महांगडे यांना ‘आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड २०२६ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील रिजेन्ता प्लेस येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कॉलेज, महागावचे प्राचार्य व प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. पांडुरंग पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ. प्रकाश कदम उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शांताराम कारंडे, मिसेस इंडिया व सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी चित्रे, अॅड. ब्रिजेश शास्त्री, प्रा. रईसा मुल्ला, मल्लेश चौगुले, प्रा. डॉ. मारुती पाटील, डॉ. दिलीप नेवसे, प्रा. नितीन जाधव, रवींद्र शास्त्री, प्रकाश धनगर, प्रा. विठ्ठल नाईक, सचिन आठवले, सुनील फरांदे, सुदाम हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्तात्रय महांगडे यांना ‘आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

या पुरस्काराबद्दल अभय कुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), शेजवळकर (माजी सरसचिव), शांताराम कारंडे, संदीप शिंदे (माजी जिल्हा परिषद सदस्य), अशोक बापू गायकवाड (नेते, आरपीआय), आप्पा पवार (पंचायत समिती सदस्य, सातारा), शिवाजी गायकवाड, यादव आबा महांगडे, भगवान महांगडे पाटील, प्रकाश अण्णा महांगडे, राजू अंकल, शिवाजी महांगडे, वैभव महांगडे, विकास महांगडे, गणेश महांगडे, मदन महांगडे, प्रकाश शिंदे, रोहिदास शिर्के, अमोल महांगडे, स्वप्निल भाई गायकवाड (पंचायत समिती सदस्य, वाई), एच.पी. पाटील, तांदळे सर, ज्ञानदेव सावंत (सरपंच), शाहीर विठ्ठल खंजोडे, दिलीप सावंत, शिंदे कुशी, अभिनेते गणेश शिंदे, निर्माते शिवाजी सावंत, दीपक महांगडे (कृषी अधिकारी), घनश्याम सावंत (अभिनेते), प्रिया निंबाळकर, विद्या सावंत, दीपक कदम, समर्थ पॅनल, संदीप मोहिते पाटील, नितीन पाटील, किरण जाधव यांच्यासह बिनधास्त मित्र मंडळ व रणझुंजार मित्र मंडळ, कोल्हापूर-पसरणी, तसेच पसरणी, वाई, कुशी, नागेवाडी गावातील ग्रामस्थांनी महांगडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Comment

Traffic Tail