पुणे : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्याचा उपक्रम मा. श्री. अजयभाऊ साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी गोकुळनगर, पुणे येथील माय माऊली केअर सेंटरमध्ये वयोवृद्ध महिलांसाठी अन्नदान व कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तसेच श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, कात्रजगावचे उपाध्यक्ष मा. श्री. अजयभाऊ साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त “वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी!” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून माय माऊली केअर सेंटरमधील वयोवृद्ध महिलांना अन्नदान तसेच आवश्यक कपड्यांचे वाटप करण्यात येणार असून, समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र कॉम्प्युटर अकॅडमी, धनकवडी, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. उपक्रमासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहराचे कार्याध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कांबळे तसेच महाराष्ट्र न्यूज मराठीचे संस्थापक व मुख्य संपादक आणि महाराष्ट्र कॉम्प्युटर अकॅडमीचे संस्थापक शाहजहान शेख यांचे सहकार्य लाभत आहे.

- वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत गरजू आणि वयोवृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. “सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.








