वाई : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे वाई येथे सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत जामा मशिदीसमोरील शेड येथे हे शिबिर होणार आहे.
शिबिरात हृदयरोग तपासणी, ईसीजी, रक्तातील साखरेची तपासणी, नेत्र तपासणी करण्यात येणार असून, गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले जाणार आहे. तसेच अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

समाजहित व जनसेवेच्या भावनेतून आयोजित या शिबिराचा नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल बाबा शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक भाई शेख, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, वाई विधानसभा अध्यक्ष ॲड. निलेश डेरे, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तेजपाल वाघ, सातारा जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई देशमुख, युवक वाई तालुका अध्यक्ष संतोष पवार, वाई शहर अध्यक्ष डॉ. सतीश बाबर, युवक शहराध्यक्ष सुरेश देशमाने, शहर महिला अध्यक्ष मोनिका चव्हाण, शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष काजल अंबवडे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाई तालुका अध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे मुशरफ भाई मोमीन यांनी केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.








