मोहमद पैगंबर जयंतीनिमित्त वाई मध्ये मोफत आरोग्य शिबिर व तपासणी

 

वाई : दि. 25 पैगंबर हजरत मोहम्मद  यांच्या पवित्र जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे वाई येथे सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत जामा मशिदीसमोरील शेड, वाई येथे हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात हृदयरोग तपासणी, ईसीजी तपासणी, रक्तातील साखरेची (मधुमेह) तपासणी, नेत्र तपासणी तसेच गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.समाजहित आणि जनसेवेच्या भावनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून तसेच आपल्या कुटुंबीयांनाही या उपक्रमाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते साहिल बाबा शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक भाई शेख, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, वाई विधानसभा अध्यक्ष ॲड. निलेश डेरे, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तेजपाल वाघ, सातारा जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई देशमुख, युवक वाई तालुका अध्यक्ष संतोष पवार, वाई शहर अध्यक्ष डॉ. सतीश बाबर, वाई युवक शहराध्यक्ष सुरेश देशमाने, वाई शहर महिला अध्यक्ष मोनिका चव्हाण, वाई शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष काजल अंबवडे तसेच मोमीन वेल्फेअर असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. गफार मोमीन, जिल्हा उपाध्यक्ष नौशाद मोमीन, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सातारा जिल्हा उपाध्यक्ष उस्मान भाई मोमीन, मी मुस्लिम मावळा छत्रपतीचा याचे संस्थापक अध्यक्ष सादिक भ नगरसेवक शब्बीर भाई पठाण, यस ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वशिम अत्तार ,वाई मुस्लिम जमातचे अध्यक्ष मन्नान भाई जमादाद, सामाजिक कार्यकर्ते राजीव भाई मोमीन, आरपीआय दिव्यांग संघटना सातारा जिल्हाध्यक्ष अजीम भाई इनामदार (बाजीगर )जुलूस कमिटीचे अध्यक्ष अली इनामदार व उपाध्यक्ष फारुख भाई मोमीन, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महासचिव प्रणित मोरे  यांची उपस्थिती राहणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाई तालुका अध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे मुशरफ भाई मोमीन यांनी केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Traffic Tail