बाजीगर भाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना व अयान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

वाई प्रतिनिधी, दि. १७ :

वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याची परंपरा जपत संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष बाजीगर भाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना व अयान फाउंडेशन, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब, गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळा क्रमांक १ येथे झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन किट, पेन्सिल, पट्टी आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक बापू गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून अयान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अन्सार भाई पटेल उपस्थित होते. यावेळी रिपाईचे वाई विधानसभा अध्यक्ष संतोष तात्या गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष काली दादा घाडगे, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश मिसाळ, वाई तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे तसेच संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अशोक बापू गायकवाड म्हणाले, “बाजीगर भाई इनामदार हे केवळ वाढदिवस साजरा करत नाहीत, तर तो समाजातील गरजू, गरीब आणि विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा दिवस बनवतात. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी ते सातत्याने निःस्वार्थपणे कार्य करत असून, त्यांचे हे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे.”


या उपक्रमाचा लाभ वाई नगरपालिका शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक ९, सेंट थॉमस हायस्कूल तसेच संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सभासदांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना झाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून बाजीगर भाई इनामदार भावूक झाले.
बाजीगर भाई इनामदार हे अनेक वर्षांपासून दिव्यांग, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, शैक्षणिक साहित्य वाटप, मदतकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक दळवी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाजीगर भाई इनामदार यांनी मानले.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail