दिशा स्टडी सेंटरच्या स्कॉलरशिप बॅचचे घवघवीत यश; सहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

वाई, प्रतिनिधी : शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची खरी कसोटी मानली जाते. या परीक्षेत दिशा स्टडी सेंटर, वाईच्या स्कॉलरशिप बॅचने यंदा नेत्रदीपक यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा राज्यभर छाप पाडली आहे. यंदाच्या परीक्षेत केंद्रातील २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, दिशा स्टडी सेंटरच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आजपर्यंत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत संस्थेच्या गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका गुणवत्तायादीतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत केंद्राच्या यशात भर घातली आहे.
विशेष म्हणजे, वाई तालुक्यातील शहरी भागातून तालुकास्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या एकूण २६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २३ विद्यार्थी दिशा स्टडी सेंटरचे असून, या यशातून शिष्यवृत्ती परीक्षेतील केंद्राचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या यशामध्ये अदिती वनारसे हिने २८२ गुण (९४ टक्के) मिळवत राज्यात आठवा, जिल्ह्यात अकरावा आणि तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. वैष्णवी जायगुडे हिने २७६ गुणांसह राज्यात अकरावा, अभिज्ञा दळवी हिने राज्यात बारावा, अथर्व जायगुडे याने राज्यात तेरावा, अनघा शिंदे हिने राज्यात चौदावा, तर सोहम बोंबले याने राज्यात पंधरावा क्रमांक मिळवत राज्यस्तरावर दिशा स्टडी सेंटरचा लौकिक उंचावला.
तसेच आस्था तनपुरे, प्रथमेश शिंदे, श्लोक मोकाशी, स्वरा गोळे, रसिका ताटे, शंभूराज धाडवे, साईश येवले, प्रांजल चव्हाण, आर्यन फरांदे, विदित तांबे, वैभवी जगताप, आदित्य जाधव, अक्षदा सोंडकर, वैष्णवी पिसाळ, यश यादव, हरिता मंचुके, श्रेयस ढगे, शार्दूल घाडगे यांनीही उत्कृष्ट गुणांसह शिष्यवृत्ती मिळवली. सर्वेश जावळे याने ग्रामीण सर्वसाधारण गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत विशेष यशाची नोंद केली.
या दैदिप्यमान यशामागे दिशा स्टडी सेंटरच्या अनुभवी व समर्पित शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. मराठी विषयासाठी अर्चना ढगे-जाधव आणि जयश्री फरांदे, गणित विषयासाठी शुभांगी बोंबले आणि निरंजन पवार, बुद्धिमत्ता विषयासाठी प्रवीण जगताप आणि नजहत मुजावर, तर इंग्रजी विषयासाठी रेश्मा भगत यांनी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन केले. संपूर्ण शैक्षणिक नियोजनाची धुरा अकॅडमिक हेड प्रियांका येवले यांनी समर्थपणे सांभाळली. नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांसाठी शास्त्रशुद्ध व नियोजनबद्ध तयारी करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना हे उल्लेखनीय यश मिळवता आले.
दिशा स्टडी सेंटरचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम हे राज्यातील ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संकल्पनाधारित अध्यापन, संशोधनाधिष्ठित अभ्यासपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन या तत्त्वांवर त्यांनी दिशा स्टडी सेंटरची भक्कम उभारणी केली आहे. संस्थेच्या संचालिका प्रा. रूपाली कदम या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शिस्तबद्ध शैक्षणिक नियोजन, पालकांशी प्रभावी समन्वय आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेच्या यशात मोलाचे योगदान देत आहेत. प्रा. डॉ. नितीन कदम आणि प्रा. रूपाली कदम यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दिशा स्टडी सेंटर आज वाई तालुक्यासह परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती मार्गदर्शनाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखले जात आहे.
यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिशा स्टडी सेंटरच्या संचालिका प्रा. रूपाली कदम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यामुळे हे दैदिप्यमान यश शक्य झाले आहे. दिशा स्टडी सेंटरमध्ये शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी शास्त्रशुद्ध व नियोजनबद्ध तयारी करून दिली जाते. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शन देत राहू.”
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक वृंद तसेच दिशा स्टडी सेंटरचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम आणि संचालिका प्रा. रूपाली कदम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail