वाई, प्रतिनिधी :
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रसेवा दलाचे वाई तालुका अध्यक्ष दत्तात्रय महांगडे (बापू) यांना इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वसुंधरा पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला.
इचलकरंजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात माजी खासदार तथा कर्नाटक बँकेच्या संचालिका डॉ. श्रीमती निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रीय महासंचालक भारतीय क्रीडा विकास निलेश राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्यासह उदय धातुंडे,राजेंद्र काणे , रवींद्र माने, सत्यवान हाके, प्रशांत देवकर, विजय तोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय महांगडे यांनी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करताना वाई तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे माजी उपाध्यक्ष म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व संस्कार रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही महांगडे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून त्यांनी अनेक विवाह जुळवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या सन्मानाबद्दल कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे (स्वामी विवेकानंद संस्था, कोल्हापूर), शेजवळकर सर, अशोक कारंडे सर (माजी सहसचिव), माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे, वाई पंचायत समिती सदस्य स्वप्निलभाई गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश महांगडे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान महांगडे पाटील, कृषी अधिकारी दीपक दत्तात्रय महांगडे, प्रवीण सावंत, यादव आबा महांगडे, संजय महांगडे, बापू थोपटे, शिवाजी महांगडे, वैभव महांगडे, प्रशांत थोरवे पत्रकार , सुनील फरांदे दिलीप सावंत, ज्ञानबा सावंत, सदाशिव नेवसे, विजय जाधव, गणेश महांगडे, किरण चौधरी, संदीप फणसे, संदीप महाळुकर, विकास महांगडे, मारुती फाउंडेशनचे शिर्के, शेखर मोहिते, एच. बी. पाटील, दळवी सर, अशोक पाटणे, तांदळे सर, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, शशिकांत महांगडे, आयशा भाभी (कण्हेरी), उमेश पाटील, अभिनेते गणेश शिंदे, अभिनेते संदीप मोहिते पाटील, निर्माता शिवाजी सावंत, समर्थ पॅनल मुंबईचे दीपक कदम, शाहीर विठ्ठल खंजोडे, देशपांडे सर, अभिनेत्री अश्विनीताई महांगडे, छाया मालुसरे, विद्या खामकर, प्रिया निंबाळकर आणि उर्मिला डांगे, पसरणी ग्रामस्थ , नागेवाडी ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
दत्तात्रय महांगडे (बापू) यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे वाई तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









