महाराष्ट्र प्रतिनिधी : अमर पठारे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आंब्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची गंभीर घटना घडली. आगीचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना मदत करत अग्निशामक दलाशी समन्वय साधला. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला त्वरित पाचारण करण्यात आले. युवा क्रांती फाउंडेशनच्या युवकांच्या तत्पर प्रयत्नांमुळे व अग्निशामक दलाच्या सहकार्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या मदतकार्यात धुळे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव गिरीश मोरे, सल्लागार गणेश बारी, महाराष्ट्र सल्लागार अशोक महाराज तसेच इतर पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सातत्याने सामाजिक कार्य, आपत्ती व्यवस्थापन आणि जनसेवेचे कार्य करत असून शिरपूर येथील या घटनेतही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला.
स्थानिक नागरिकांनी युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मदतकार्याबद्दल कौतुक व्यक्त केले.









