एस.पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘यशाचा सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे | प्रतिनिधी

एस.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक शाळा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘यशाचा सत्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या परीक्षेत श्रुती योगेश खोपडे (९१.६७%), ज्ञानेश अनिल पाटील (९०%), विभावरी विजय पोळेकर (८७.५०%), सागर सुबोध माजी (८५.३३%), तन्वी राणे (८२.५०%), अमृता निरंजन धांगले (८२%) आणि जाह्नवी कांबळे (८०.५०%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘बारावीनंतर पुढे काय?’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य रणसुरे सर तसेच डॉ. राजेश्वर वा. हेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या सचिव मा. सौ. मंगलताई सोकांडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर नियोजन, आत्मविश्वास आणि जीवनातील यशासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली.

 

यावेळी महाराष्ट्र न्यूज मराठीच्या वतीनेही यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र न्यूज मराठीचे संस्थापक व मुख्य संपादक शहाजहान शेख तसेच पुणे जिल्हा संपादक दत्तात्रय कांबळे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हांचे वितरण करण्यात आले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अरुण भाऊ सोकांडे पाटील, प्राचार्य सोकांडे पाटील, संस्थेच्या सचिव मा. मंगलताई सोकांडे पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शन, नियोजन आणि परिश्रमांमुळे सत्कार सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व दिमाखदार वातावरणात पार पडला. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे तसेच आयोजकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail