दि(.५) सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक योगेश मोहन शितोळे वय (३५) राहणार शिरुर हे सकाळी सिंहगड किल्ला फिरण्यासाठी आले होते.संध्याकाळी साधरण पाच वाजता सुमारास सुर्यास्त पाहण्यासाठी पश्चिम दिशेला हवा पॉईंट या ठिकाणी सुर्य किरणांचे फोटो घेत.असताना गवतावरुन पाय घसरून ते दिडशे फूट खोल दरीत कोसळले.व काही काळ शुद्ध हरपली.शुध्दीवर आलेवर त्यांनी ११२ ला फोन करून सविस्तर माहिती दिली.त्यानंतर हावेली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अनिकेत काळे यांनी संबंधित माहिती हावेली आपत्ती व्यवस्थापन समिती (रेस्क्यू)टिमचे प्रमुख तानाजी भोसले यांना दिली.तात्काळ त्यांच्या बचाव कार्यासाठी रेस्क्यू टिम,हावेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वनविभाग, व्यवस्थापन समिती कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साधारण दिडशे फुट खोल दोराच्या साह्याने दरीत जाऊन जखमी योगेश शितोळे यांना सुरक्षित ,सुखरूप वर आणले.पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले .यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली.या कामांसाठी हावेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने प्रमुख तानाजी भोसले,संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ, वैभव भोसले पोलीस कर्मचारी अनिकेत काळे, प्रविण तेलवाडे वनविभाग वनव्यवस्थापन समितीचे कैलास जंराडे यांनी मोलाचे सहकार्य केले.









