पुणे प्रतिनिधी :
किल्ले सिंहगडावर आलेल्या मनिषा धर्मदास गायकवाड वय(२८) राहणार धनेगाव.जि.नादेड सध्या राहणार बिजलीनगर चिंचवड पुणे असे मृत महिलेचे नाव आहे.गेले काही दिवसापूर्वी सिंहगड किल्ल्यांवरती तोफ गाडा या उंच तटबंदी ठिकाणी एक अनोळखी बॅग आढळूनआली होती.यावरुन कुणीतरी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता.हा सगळा प्रकार पोलिस प्रशासनाला कळवण्यात आला.शोध मोहीम घेत असताना बेपत्ता तरुणी तीन दिवसांनी मृत अवस्थेत सापडली.या शोध मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन समिती हावेली, वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती घेरा सिंहगड, पुरातत्व विभाग ,पोलिस प्रशासन, अग्निशामक दल यांच्या सतर्क प्रयत्नात यश आले व मृतदेह सापडला.नक्की आत्महत्या आहे.का? घातपात पुढील तपास अभिरुची पोलीस स्टेशन मुख्य पो.निरिक्षक वैशाली पाटील मॅडम करत आहे.









