पेठ,भिलारवाडी घेरा सिंहगड गावांमध्ये भगवान विष्णूची मूर्ती” शिवगंगा खोर्यात सगळीकडे किर्ती” असेच चित्र दिसुन येतं आहे.
पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे
शिवगंगा उगम ठिकाणी, (कल्याण)पेठ ,भिलारवाडी घेरा सिंहगड येथे जुने पुर्वीच्या काळातील आई काळूबाई मंदिर आहे. हे मंदिर जुने असल्याने काही वर्षांपूर्वी नवीन दुरूस्ती बांधकाम करत असताना मंदिराच्या आवारात बांधकाम पाया खोदकाम करताना श्री विष्णू भगवान पद्मनाभ व श्रीधर अशा,दोन मुर्ती सापडली आहे .शिवगंगा खोर्यात एक आश्चर्याची गोष्ट मानली जात आहे.भगवान विष्णू मुर्ती पाहण्यासाठी देव दर्शन घेण्यासाठी भावीक भक्तांची रांग लागलेली आहे असे चित्र दिसून येत आहे.या मुर्तीचा आंनद सोहळा , प्राणप्रतिष्ठा ,स्थापना करण्याचा समस्त (कल्याण )पेठ ,भिलारवाडी घेरा सिंहगड ग्रामस्थ यांनी निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने श्री. विष्णू मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन , कार्यक्रम दि. २१ रविवार कलश, पूजन ,मिरवणूक होईल व दि. २२ सोमवार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. असा दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. असे काळुबाई देवस्थानचे पुजारी राघुदास मोरे व ह. भ.प.आमोल मोरे ,सा. कार्यकर्ते संदीप रेणुसे यांनी सांगितले आहे. सर्व पंचकोशीतील भाविक भक्तांनी या आनंद सोहळ्यात उपस्थित राहावे. व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे नरवीर तानाजी मित्र मंडळ (कल्याण)भिलारवाडी ,पेठ घेरा सिंहगड ग्रामस्थ कडून आव्हान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण, पेठ, भिलारवाडी मोरदरी, शिवतरवाडी, शिवगंगा खोरे व समस्त भक्तजनाकडुन करण्यात येणार आहे.









