
दिनांक :13 चिखली :समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत महादेव (नाना) मारुती वाडकर यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १४) चिखली येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चवणेश्वर मंदिर, चिखली येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
शिबिरामध्ये दातांची संपूर्ण तपासणी, हिरड्यांची तपासणी, दातांवरील किड व इतर समस्यांचे निदान, तोंडाच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचारांबाबत तज्ज्ञ सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांना दंत आरोग्याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महादेव (नाना) वाडकर यांनी आपल्या कार्यकाळात परिसरातील अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे मोफत दंत तपासणी शिबिर समाजसेवेच्या भावनेचे प्रतीक ठरत आहे.
शिबिरासाठी श्री समर्थ कृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल केअरच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार असून डॉ. गीतम दुदुसकर, डॉ. सिद्धिका दुदुसकर आणि डॉ. अभिजीत वाडकर हे नागरिकांची तपासणी करणार आहेत.
समस्त वाडकर परिवार, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









