चांदवड घाटात एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४६ प्रवाशांचे प्राण वाचले

नाशिक प्रतिनिधी : अमर पठारे

नाशिक जिल्ह्यातील चांदवड घाटात धावत्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ४६ प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नियमित प्रवासी वाहतूक करत असताना चांदवड घाट परिसरात बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्याच्या सूचना दिल्या. प्रवासी खाली उतरल्याच्या काही क्षणांतच बसने पेट घेतला. आगीने काही वेळातच संपूर्ण बसला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किट किंवा यांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ४६ प्रवाशांचे प्राण वाचल्याने प्रवाशांनी त्याचे कौतुक केले. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail