90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यार्थ्यांनी संस्थेचा गौरव वाढवला
पुणे प्रतिनिधी: अमर पठारे
शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या S. P. International School & College ने यंदाच्या HSC बारावी बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकालाची उज्ज्वल नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या परीक्षेत संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले. त्यामध्ये श्रुती योगेश खोपडे हिने 91.67 टक्के गुण मिळवत विशेष यश मिळवले. तसेच ज्ञानेश अनिल पाटील याने 90 टक्के, वैभवी विजय पोळेकर हिने 87.50 टक्के, सागर सुभोध माझी याने 85.33 टक्के आणि अमृता निरंजन घांगले हिने 82 टक्के गुण मिळवत संस्थेचा गौरव वाढवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“We Shape Bright Futures” या संस्थेच्या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी विद्यार्थ्यांनी करून दाखवली असून, यामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.









