कात्रज पोलिसांची ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’विरोधात धडक कारवाई

पुणे, कात्रज : वाढते अपघात आणि मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कात्रज वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ तपासणी मोहीम राबविण्यात आली. रात्रीच्या वेळी वाहनचालकांची0 तपासणी करून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

या कारवाईदरम्यान चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे, परवाना तसेच0 मद्यप्राशन केले आहे का, याची तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे स्वतःसह इतरांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक कैलास कोळेकर, कॉन्स्टेबल प्रशांत पवार तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. एस. खंडाळे यांच्या सहभागाने करण्यात आली. नाकाबंदीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले.

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

‘दारू पिऊन वाहन चालवू नका, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका,’ असा संदेश कात्रज वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना दिला आहे. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांच्या कारवाईस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Traffic Tail