पुणे प्रतिनिधी : युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या पुणे शहर युवा कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रामचंद्र थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा क्रांती फाऊंडेशनच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासोबतच पोलीस मित्र, ग्राहक, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम राबविला जात असल्याचे संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकातून नमूद करण्यात आले आहे.
ऋषिकेश थोरवे यांच्यावर पुणे शहरातील संघटनेच्या युवा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून युवकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, नागरिकांमध्ये कायदे व अधिकारांविषयी जनजागृती करणे तसेच सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
थोरवे यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वरील नियुक्ती ही पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल रेळेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. दत्तात्रय कांबळे यांच्या वतीने देण्यात आली








