पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे
इस्रो प्रवेश परीक्षा उत्तीर्ण कु. वेदिका निखिल डिंबळे इ.६वी तर नासा प्रवेश परिक्षा उत्तीर्ण कु. ऐश्वर्या राजेश डिंबळे इ. ६ वी या दोन विद्यार्थी चिमुकल्या यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्या आहेत.
जिल्हा प्राथमिक शाळा कल्याण पोस्ट शिवापूर ता. हावेली जिल्हा पुणे इयत्ता सहावी विद्यार्थी यांनी इस्रो व नासा येथे भेट देण्यासाठी व जाण्यासाठी गुणवत्ता यादी परिक्षा स्थान मिळवलं आहे.पुढे २५ जुलै घेण्यात येणाऱ्या आँनलाईन परिक्षेत पुढील विद्यार्थी चे स्थान ठरणार आहे. त्यांच्या या यशस्वी यशाबद्दल शिक्षण, पालक वर्गाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातून १०३ विद्यार्थी ची इस्रो -नासा शैक्षणिक भेट देण्यासाठी निवड करण्यात येणार आहे.यासाठी या परिक्षा घेण्यात आला आहे. यांच्या या भरघोस यशाबद्दल शिवगंगा खोरे, कल्याण गावातून कौतुकाचा वर्षाव व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतीम फेरीत अधिकाधिक विद्यार्थी यश प्राप्त करो व निवड व्हावी हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आमच्या शिवगंगा खोर्यात असेच विद्यार्थी पुढे यश प्राप्त करतील असे ह.म.प. अमोल मोरे यांनी आशा व्यक्त केली आहे.









