आदर्श शिक्षक, अंधश्रद्धा निर्मूलक,पर्यावरण संवादक हिम्मतराव मलमे यांचा पन्नासावा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

पलूस प्रतिनिधी

पन्नास शाळांना पन्नास वडाची रोपे व पन्नास पुस्तक संचाची भेट ,तर 50 किलोमीटरच्या सायकल राईडला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

एका लोकप्रिय शिक्षकाच्या वाढदिवसाला हजारोंची उपस्थिती व शुभेच्छा…

पलूस शहरातील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरातील उपक्रमशील आदर्श शिक्षक ,अंधश्रद्धा निर्मूलक, पर्यावरण संवादक म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे असे पुरोगामी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते हिम्मतराव शिवाप्पा मलमे यांचा नुकताच पन्नासावा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विश्वनाथ मल्टीपर्पज हॉलमधील झालेल्या वाढदिवस सोहळ्यास एक हजारापेक्षा जास्त मान्यवर कार्यकर्ते ,हितचिंतक ,नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सदर वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी लवकर पलूस ते ईश्वरपूर व परत पलूस अशी 50 किलोमीटरची ‘सायकल चालवा, आरोग्य सांभाळा,प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा’ या घोषणा देत सायकल राईड काढण्यात आली.

यात पलूस,आष्टा परिसरातील अनेक तरुण मित्रांनी भागीदारी केली. त्यानंतर आपल्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त 50 वर्षातील 14 वे रक्तदान करण्यात आले. तर विश्वनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. बाबुराव गुरव ,भाई व्ही.वाय.आबा पाटील ,क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू ॲड. सुभाष पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सदस्य राहुल थोरात, महामार्ग संघर्ष समितीचे नेते डॉ.अमोल पवार ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे अध्यक्ष दगडू जाधव ,शिक्षक नेते मारुती शिरतोडे ,अंगद जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हिम्मतराव मलमे यांना मानपत्र, पुस्तक,शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .

या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या आईला वंदन करून करण्यात आली तर मलमे सरांना प्राथमिक शाळेपासून शिकवलेल्या भानुदास माळी, सदाशिव चौगुले व शामराव टोणपे या तीन 80 व 90 दी पार केलेल्या ज्येष्ठ गुरुजनांचा सपत्नीक पुस्तक व पूर्ण पोशाख देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. या वाढदिवस सोहळ्यात पलूससह परिसरातील 50 शाळांना वडांची रोपे व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले तर वीट भट्टीवर कामगार असलेल्या वंचित पालकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक, कृषी तसेच राजकीय आघाडीवर काम करणारे कार्यकर्ते मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शिक्षक नेते मारूती शिरतोडे यांनी केले तर आभार पत्रकार दीपक पवार यांनी मानले. कार्यक्रमास मित्र मंडळी,नातेवाईक, परिसरातील विविध शाळांचे शिक्षक, मलमे सरांचे आजी माजी विद्यार्थी, सायकलिस्ट, पत्रकार ,डॉक्टर्स आदी मान्यवर मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail